“EVM हटाव भारत देश बचाव” करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा यांना निवेदन

0
177

“EVM हटाव भारत देश बचाव” करिता भारतीय बौद्ध महासभा चे तहसीलदार राजुरा यांना निवेदन

 

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आद डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्या मध्ये, सर्व तालुका शाखा, शहर व ग्राम शाखा च्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2024 ला EVM हटाव भारत देश बचाव हा नारा घेऊन ईव्हीएम मशीन बंद करण्याबाबत भारताच्या राष्ट्रपतीला, पंतप्रधानाला तसेच निवडणूक आयोगाला एकाच दिवशी निवेदन दिले.

तहसील कार्यालय राजुरा येथे आज दी 29 जानेवारी 2024 रोज सोमवार ला भारतीय बौद्ध महासभा राजुरा शाखा च्या वतीने मा. तेलंग साहेब नायब तहसीदार राजुरा यांचे कार्यालयात दुपारी 2 वाजता भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी तसेच संस्थेच्या सदस्य असे एकूण 59 सह्याची निवेदन देण्यात आले. या करिता धरमुजी नगराळे अध्यक्ष, गौतम चौरे सरचिटणीस, गौतम देवगडे कोषाध्यक्ष, भिमराव खोब्रागडे उपाध्यक्ष, मेघाताई बोरकर अध्यक्षा, किरणताई खैरे कोषाध्यक्ष, वंदना देवगडे उपाध्यक्षा, रत्नमाला मावलीकर उपाध्यक्षा, शीतलताई ब्राम्हने ग्राम अध्यक्षा, प्रेमिला नळे,पौर्णिमा ब्राम्हणे, कमल टेकाडे उपाध्यक्षा, तुळसाबाई खडसे, सुमन कांबळे, कुसुमताई कातकर, नागोराव पडवेकर, उत्तम रामटेके, दिवाकर जनबंधू, सतीश ब्राम्हणे इत्यादी राजुरा शाखा व राजुरा शहर, ग्राम शाखा चे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here