घुग्घुस येथील ज्वलंत मुद्दे घेवुन गांधी चौकात काँग्रेसतर्फे एकदिवसीय विविध समस्यांवर धरणे आंदोलन

0
182

घुग्घुस येथील ज्वलंत मुद्दे घेवुन गांधी चौकात काँग्रेसतर्फे एकदिवसीय विविध समस्यांवर धरणे आंदोलन

 

पंकज रामटेके/ विशेष प्रतिनिधी

घुग्घुस येथील दि.३० जानेवारी २०२४ मंगळवार रोजी गांधी चौकात सकाळी ११ वाजता चंद्रपूर माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)काँग्रेस कमिटीचे प्रकाश देवतळे यांच्या मार्गदर्शनात तसेच माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालिका शोभाताई ठाकरे,काँग्रेस माजी शहर अध्यक्ष जावेद सिद्दिकी यांनी सर्वप्रथम विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा गांधी व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण,पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले.तसेच शहरातील विविध,समस्याचा मागण्यावर धरणे आंदोलनावर सुरुवात केली.

मा.जिल्हाध्यक्ष ग्रामीण काँग्रेस कमिटीचे प्रकाश देवतळे म्हणटले की,प्रामुख्याने अनेक वर्षांपासून घुग्घुस शहरातील प्रदुषणाचा विषय आहे,आणि या प्रदुषणाचा कुठेतरी आतातरी उपाययोजना उद्योगाच्या “व्यावसायिक सामाजिक जबाबदारी” (CSR) निधीच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही प्रशाशनाला केलेली आहे,आणि प्रामुख्याने या शहराला जवळ-जवळ तीस ते चाळीस वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहे,परंतु यांच्या कायमस्वरूपी पट्टे मिळाले पाहिजे ते मळाले नाही असुन, या ठिकाणी अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे हि मागणी आम्ही करत आहे,आणि आज या धरणे आंदोलनाचा माध्यमातून प्रशासनाचे डोळे उघडे करण्याकरिता हे धरणे आंदोलन आम्ही केलेले आहे,या शहरातील नागरिकांना लवकरात-लवकर जाहीर स्वरुपी पट्टे द्यावे आणि इथल्या नागरिकांना जे टॅक्स भरत आहे,त्यांचे मालकीची मालमत्ता त्यांचा नावानी होत नाही आहे,जे इथे कायम राहत आहे असुन सुद्धा त्यांना कायमस्वरूपी पट्टे त्या लोंकाना मिळाले पाहिजे त्याच बरोबर ते पूर्व या ठिकाणी घरे होते,त्याचपण ही टॅक्सच्या माध्यमातून फेरफाड केले आहे, त्यांना सुद्धा नियमित करायच काम प्रशाशनानी लवकरात-लवकर करण्यात यावे.सोबतच या शहरामध्ये साफ-सफाई मोठा विषय आहे,या ठिकाणी ग्रामपंचायच्या नंतर नगरपरिषद झाली आहे,परंतु अपूर्ण कामे व ज्वलीत समस्यांवर तोंड द्यावे लागतात, करून या ठिकाणी आजचा या धरणे आंदोलन एकदिवसाचा होता.

ज्वलंत विषयांच्या एक दिवसीय धरणे आंदोलनाचे अनु.जाती विभाग तालुकाध्यक्ष राजकुमार (दादु) वर्मा तसेच अनु.जाती शहर अध्यक्ष विक्रम गोगला यांच्या सहयोगाने करण्यात आले.

यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर गोगला,गणेश ऊईके,काँग्रेस नेते उत्तम ठाकरे,पवन नागपुरे,अशपाक शेख, सतिश सोनारी, सोनल गोगला,प्रशांत अटेला,अमन सौदारी,अमर आगदारी,प्रकाश वर्मा तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here