पेट्रोल, डिझेल व गँस वाढीच्या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन

0
640

पेट्रोल, डिझेल व गँस वाढीच्या विराेधात राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन

मूल (चंद्रपूर) किरण घाटे

मूल शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांचे सूचनेनुसार आज विविध ठिकाणी बॅनर, होल्डिंग लावून वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमती, बेसुमार वाढलेली बेरोजगारी, जिडीपी ची घसरण या विरोधात मूल शहरात पेट्रोलपंप, सोमनाथ रोड, चंद्रपूर रोड, नागपूर रोड आदी ठिकाणी सुमितभाऊ समर्थ यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले. सदरहु आंदोलनात घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल व गॅसची दरवाढ कमी झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलन कर्त्यांनी या वेळी इशारा दिला. या निषेध आंदोलनात किसनजी वासाडे, महिला शहराध्यक्ष अर्चनाताई चावरे, भास्कर खोब्रागडे, प्रशांत भरतकर, जीडीवर हेमंत सुपणार, सुरज तोडसे, इंद्रपाल पुणेकर, रितीक संगमवार, हरिदास मेश्राम, राहुल बारसागडे व इत्तर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here