माजी आमदार निमकर यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड

0
198

माजी आमदार निमकर यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड

जिल्ह्यातील सर्वांगीण विविध विकास कामांचे नियोजन व कार्यान्वयन करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी माजी आमदार सुदर्शन निमकर यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शिफारशीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार नियोजन विभागाचे उपसचिव श्री नि.बा. खेळकर यांचे पत्र क्र./ डीएपी/२०२३/प्रक्र ७४-१४८१ दि. २५ जानेवारी २०२४ च्या आदेशान्वये ही निवड करण्यात आली आहे.

माजी आमदार निमकर यांचा योजनांच्या संबंधाने असलेला अभ्यास व विकास कामासंबंधी करावयाचा पाठपुरावा व विकास कामे खेचून आणण्याची असलेली सचोटी यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी लागली आहे. नुकतेच राजुरा क्षेत्रातील ऐतिहासिक प्रसिद्ध अशा सिद्धेश्वर मंदिर स्मारकाच्या पुनर्निर्मान, जतन दुरुस्तीच्या कामाकरिता 15 कोटी रुपये मंजूर करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार व विभागाचे अधिकारी यांच्याकडे मागणी व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे 15 कोटी रु.निधी मंजूर होऊ शकला. माजी आमदार निमकर यांची नुकतीच शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने सिद्धेश्वर देवस्थान स्मारकाच्या जतन दुरुस्ती व देखरेख नियंत्रण समितीच्या मुख्य निमंत्रक पदी नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतरच महत्त्वपूर्ण अश्या जिल्हा नियोजन समितीवर माजी आमदार निमकर यांची निवड केल्याबद्दल पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे राजुरा विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेने आभार मानले आहे. व या निवडीबद्दल माजी आमदार निमकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच वरोरा चे माजी नगराध्यक्ष श्री अहेतेशाम अली व भद्रावती येथील श्री हरीश दुर्योधन यांची सुद्धा या समितीवर निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here