क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्त वरुर रोड येथे निबंध व वकृत्व स्पर्धा संपन्न 

0
765

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती निमित्त वरुर रोड येथे निबंध व वकृत्व स्पर्धा संपन्न 

राजुरा🟥☀️किरण घाटे🟥🟢🛑🟢जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जानेवारी २०२१ ला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला शिक्षण दिन तथा बालिका दिवस साजरा करण्यात आला. यावेळी निबंध स्पर्धा,आणि वकृत्व स्पर्धेचे आयोजन विशाल शेंडे यांनी केले. 🟥🟢☀️🌀सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि आजची स्त्री हा विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आला हाेता🟥🟢☀️ आरंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले 🟥🟢☀️🌀दरवर्षी वरूर रोड येथे प्रयेक महामानवाच्या जयंत्या व पुण्यतिथ्या निमित्त विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजित होत असताे. २ व ३ जानेवारी २०२१ ला घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत व वाचन नाटिका वकृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून प्रावीण्य मिळविले. 🟥☀️🟢🌀सदरहु स्पर्धेला परीक्षक म्हणून विकास कोतपल्लीवार होते. विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर लेखन, वाचन, नाटिका भाषण केले. उत्कृष्ट लेखन आणि वकृत्व करणांऱ्या विद्यार्थ्यासाठी विविध बक्षिसांचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालय वरुर रोड यांच्यावतीने करण्यात आले. निबंध स्पर्धेमध्ये श्रुती बोरकर प्रथम, रिना लाटेलवार द्वितीय, पूजा गायकवाड तृतीय तर वकृत्व स्पर्धेमध्ये समीक्षा जीवतोडे प्रथम , समीक्षा मोडक द्वितीय तर प्रवीण चौधरी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरल्या उपराेक्त घेण्यात आलेल्या दोनही स्पर्धेचे बक्षीस वितरण संगीता कोडापे सरपंच वरूर रोड , विनोद गेडाम तलाठी कार्यालय वरूर रोड, आणि सीताराम मरापे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय वरूर रोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे आणि सन्मानचिन्हे देऊन विद्यार्थांना गौरविण्यांत आले 🟥☀️🟢🌀या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता साहिल मडावी, विशाल शेंडे, प्रवीण चौधरी, प्रज्वल बोरकर, गौरव हिवरे, यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here