वैनगंगा नदीत तीन शाळकरी मुलींना जलसमाधी

0
698

वैनगंगा नदीत तीन शाळकरी मुलींना जलसमाधी

प्रति कुटुंब पाच लाख रुपयांची आर्थिक मदतीची मागणी

आमदार डॉ. देवराव होळी यांचे कुटुंबीयांना सांत्वन भेट व आर्थिक मदत

सुखसागर झाडे : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा जवळील वाघोली नदी घाटावर पैल तीरावरील झाडाचे आंबे तोडण्यासाठी डोंग्याने नदी पार करून जाणे तीन अल्पवयीन मुलींच्या जीवावर बेतले वैनगंगा नदीत त्यांच्या डोंगा ( छोटी नाव )उलटुन तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण वाघोली गावावर शोककळा पसरली आहे. मृतकात वाघोली येथील सोनी मुकरु शेंडे 13 वर्ष , समृध्दी धीवरू शेंडे 11 वर्ष या दोन चुलत बहिणीसह त्यांची आते बहीण पल्लवी रमेश भोयर 15 वर्ष रा, येवली ) यांचा समावेश आहे वाघोली येथे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी सदिच्छा भेट दिली व मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन मदत देऊन आर्थिक मदत केले.
यावेळी उपस्थित तलाठी सोमनकर , पोलीस पाटील व गावकरी यांच्या समोर आमदार डॉ देवराव होळी यांनी राज्य सरकारला या तीनही मृतक मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा आर्थिक मदत करण्याची मागणी केली.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजपा युवा मोर्चा नेते प्रतीक राठी ,भाजप पदाधिकारी नाजूक पोरटे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here