त्र्यंबकराव ठाकरे यांचे निधन

0
145

त्र्यंबकराव ठाकरे यांचे निधन
सेवानिवृत्त असुनही कोरोना मदत कार्यात अग्रेसर

गडचिरोली/प्रतिनिधी दि. १६/२/२०२४ : येथुन जवळच असलेल्या माडे तुकुम येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त तलाठी त्र्यंबकराव ठाकरे यांचे आज निधन झाले. मृत्यू समयी ते ८७ वर्षांचे होते.

सेवानिवृत्त असुनही त्यांनी कोरोना काळात महाराष्ट्र शासनाला सानुग्रह मदत निधी म्हणून दहा हजार रुपये जिल्हाधिकारी यांचेकडे दिले होते. ते शांत, सुस्वभावी आणि मनमिळावू , सहकार्य वृत्तीचे होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. दैनदिन विविध घडामोडींचा अभ्यास आणि आढावा घेण्यासाठी ते सतत वृत्तपत्रांचे वाचन करीत होते.

त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. आज ४ वाजताच्या सुमारास माडे तुकुम येथील स्मशानभूमीत त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here