समाजहितासाठी समाज समता संघ ताकतीने लढणार किशोर गजभीये…

0
316

चेतन मांदाडे /प्रतिनिधी

 

डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली समाज समता संघाची स्थापना केली.यामाध्यमातुन त्यांनी समाजात समानता प्रस्तापीत करण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविले.2010 साली आपण काही सहकार्यासह समाज समता संघाला पुर्नजिवीत केले.गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक न्यायाचा हा लढा अविरतपणे सूरू आहे.पुर्ण राज्यभर संघ काम करीत असून चःद्रपूर जिल्ह्यात कष्टकरी,दलीत,पिडीत,आदिवासी बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी संघ पुर्ण ताकतीने उभा राहिल असे प्रतिपादन समाज समता संघाचे केंद्रिय अध्यक्ष निवृत्त आयएएस अधिकारी किशोर गजभीये यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर च्या सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे,समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे,वर्षा बामणवाडे,उपहाभापती डवरे,दिपक वाढई,शेखर बोनगिरवार अदी मान्यवरांची यावेळी उपस्थीती होती.
समाज समता संघाच्या माध्यमातून सःपुर्ण देशभर प्रबोधनाचे व प्रत्यक्षात सामाजिक स्तरावर जाऊन कार्य करणे सूरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात कार्यकर्तांच्या परिश्रमाने प्रभावीपणे काम सूरू असल्याची माहीती किशोर गजभीये यांनी दिली.
बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी समता समाज संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीन काम कराव असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी उपस्थीत मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी समता समाज संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वर्षा बामणवाडे,जिल्हा सचिवपदी कैलास दुर्योधन,शहराध्यक्षापदी नाजुका पाटील,संघटकपदी रवी रायपुरे,चंद्रपुर तालुकाध्यक्षपदी दादाजी निमगडे,तर गोःडपिपरी तालुकाध्यक्षपदी शेखर बोनगिरवार यांची निवड करण्यात आली.त्यांना गजभीये यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलै.
प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांनी संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संचालन अक्षय ऊराडे तर आभार नाजुका पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here