रायलसीमा एक प्रेमकथा या चित्रपटात झडकणार घुग्घुस शहरातील नवीन सिंग

0
157

रायलसीमा एक प्रेमकथा या चित्रपटात झडकणार घुग्घुस शहरातील नवीन सिंग

काँग्रेस तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घूस : शहरातील होतकरू तरुण नवीन सिंग हा पवनसूत बाऊन्सर स्कॉटचे संस्थापक यांना टॉलिवूड इंडस्ट्रीत रायलसीमा एक प्रेम कथा या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका मिळाली आहे.

घुग्घुस सारख्या छोटया शहरातून साऊथ चित्रपटात भूमिका मिळवणे हे खूपच कौतुकास्पद आहे. सदर चित्रपटात सिंग यांच्या सोबत गब्बर इज बॅक चित्रपटाचे दिग्विजय पाटील अर्थात सुमन तलवार हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

नवीन सिंग यांचे घुग्घुस शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केले व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार सोशल मीडिया अध्यक्ष, विशाल मादर, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here