पथनाट्य द्वारे महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रम

0
137

पथनाट्य द्वारे महिला सक्षमीकरण जनजागृती कार्यक्रम

 

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून ग्रामीण भागात महिलांचे आर्थिक सामाजिक राजकीय मानसिक विकास व्हावा या उद्देशाने पांढरकवडा, म्हातारदेवी, उसगाव, नकोडा, वढा व शेणगाव या गावात पथनाट्य आयोजित करण्यात आले होते. पथनाट्य च्या माध्यमातून गावात महिला सक्षमीकरन, महिलांचे समाजात सद्याचे स्थान, महिलांवर होत असलेले अन्याय, महिला सुरक्षा कायदे व शासनाचे महिला विषयक धोरण याबाबत गावात चौका चौकात जनजागृती करण्यात आली आणि पथनाट्य नंतर गावातील महिला व नागरिकांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व ज्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिकांनी सहकार्य केले यावेळी गावातील शेकडोंच्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here