48 वर्षानंतर जगप्रसिध्द पैलवान पुन्हा उतरणार चंद्रपूरातील दंगलीत

0
146

48 वर्षानंतर जगप्रसिध्द पैलवान पुन्हा उतरणार चंद्रपूरातील दंगलीत

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात तिन दिवसीय राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धा

 

1975 साली चंद्रपूरातील कोहिनूर तलावाच्या मैदानावर जगप्रसिद्ध पैलवान दारासिंग रंधावा आणि झिबिस्को यांची लढत झाली होती. त्यानंतर आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तब्बल 48 वर्षाने महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि हरियाणा केसरी जस्सा (छोटा) या जगप्रसिध्द पैलवांनाची लढत 17 फेब्रुवारीला शनिवार महाकाली मंदिराच्या पटांगणात होणार आहे. हा सामना सांयकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कबड्डी, बाॅडी बिल्डिंग स्पर्धा पार पडली आहे. तर आता उद्या 16 फेब्रुवारी पासून चंद्रपूर शहर तालीम संघ यांच्या सहकार्याने तिन दिवस राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाकाली मंदिर येथील पटांगणात सदर स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातील कुस्ती पट्टू सहभाग घेणार आहे. ही स्पर्धा पूरुषांचे 9 वजन गट आणि महिलांचे 8 वजन गट अशा ऐकून 17 वजन गटात सदर स्पर्धा पार पडणार आहे. मागील वर्षीची अहमद नगर येथील महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंड, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीरी सोनाली मंडलीक, उपमहाराष्ट्र केसरी कौतुक धापडे, विजय शिंदे, रोहन रंदे आदी नामांकित कुस्तीपट्टु सदर स्पर्धेत सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख विरुध्द हरियाना केसरी जस्सी छोटा

श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवात आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख विरुध्द हरीयाना केसरी जस्सी (छोटा) यांची विशेष लढत रंगणार आहे. तर अर्जुन पूरस्कार प्राप्त दिव्या काकरण विरुध्द पंजाब व हरियाणा केसरी जसप्रीत कौर यांची लढत रंगणार आहे. या स्पर्धेकरीता महान भारत केसरी योगेश बोंबाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here