आमदार चषक भरवणाऱ्या आमदार व चषक आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची सुरज ठाकरे यांची मागणी

0
532

आमदार चषक भरवणाऱ्या आमदार व चषक आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची सुरज ठाकरे यांची मागणी

 

कोरोना चा नवीन प्रकार ओमिओक्रोन जगामध्ये आला व त्याचा शिरगाव हा भारतात व महाराष्ट्रात देखील झालेला असताना महाराष्ट्र शासन व केंद्र शासन पुन्हा निर्बंधाबाबत जनतेला जागृत करत असून कोरोणाचे निर्बंध पूर्णपणे संपविले नसताना देखील सत्ताधारी आपल्या राजकीय वर्चस्वाचा वापर करून कबड्डी सामने, क्रिकेट सामने अशा पद्धतीचे चषक आयोजन करीत असल्याचा प्रकार सुरु असतांना दिनांक ०४/१२/२१ रोजी कबड्डी चषकाचे आयोजन वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदारांच्या नावाने भरवण्यात आले व त्यामध्ये झालेल्या अपघातात सामान्य जनतेची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित तथा अतिशय निकृष्ट दर्जाची केली असल्यामुळे अपघात होऊन १४ लोक किरकोळ जखमी व ४ लोक गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे हे आयोजन करण्याची परवानगी आपले प्रशासन का व कशा पद्धतीने देते हेच आश्चर्यकारक व आक्षेपार्ह आहे ? असा प्रश्न यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी उपस्थित करीत आमदार व खासदार हे स्वतः कोरोना नियमांची पायमल्ली करून अशा पद्धतीचे चषक भरवीत असल्याने त्या चषका स्थळी झालेल्या अपघाता संदर्भात तात्काळ आमदार व आमदार चषक घडविणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी केली आहे. व देशाच्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिले असून आमदार किंवा खासदार यांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा कुठलाही अधिकार घटनेने दिला नसून कायदा हा सर्वांसाठी समान आहे. हे प्रशासनाने सामान्य जनतेला दाखवून आमदार व आयोजकांवर गुन्हे दाखल करून अशा पद्धतीचे सर्व चषक ताबडतोब रद्द करण्यात यावेत अशी मागणी सदर निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here