चौकशी अहवालात दोषी मात्र कारवाही शून्य

0
516

चौकशी अहवालात दोषी मात्र कारवाही शून्य

कढोली (खुर्द) ग्रामपंचयातमधील प्रकार; कारवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा

कोरपना : कोरपना तालुक्यातील ग्राम पंचायत कढोली (खुर्द) येथे सरपंच पदावर कार्यरत असतांना बनावट नमूना 8 अ तयार करणे व ग्राम पंचायत दस्ताऐवज गहाळ करणे तसेच शौचालय बांधकामाची रक्कम अफरातफर केल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाल्याने यासंबंधी पंचायत समिती कोरपना यांच्याकडे तक्रार केली असता त्या नुसार चौकशी समिति नेमून त्याची चौकशी केली, परंतु आज नऊ महिने होऊन सुद्धा दोषीवर कोणतीही कारवाही केलेली नाही व तसा कारवाई केल्याचा अहवाल दिलेला नसल्याने तात्काळ दोषींवर कारवाही करण्याचे निवेदन दत्तात्रय उपरे यांनी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरपना यांना दिले असून कारवाही न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलनाला बसण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

कढोली (खुर्द) येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेकार्डवर सौचालयाचे बांधकाम केलेले दाखविले मात्र प्रत्यक्षात त्यातील अर्ध्याच सौचालयाचे बांधकाम केल्याचे मौक्का चौकशीत दिसून आले आहे. याच बरोबर मालमत्ता नावाने नसताना बनावट नमुना आठ अ तयार करून लाभार्थ्यांना घरकुलाचे वितरण केले, दिनांक दहा सप्तेंबर २०१५ ते एक एप्रिल २०१७ पर्यंतचे ग्रामसभेचे मूळ इतिवृत्त दप्तरी उपलब्ध न ठेवता गहाळ करून नष्ट केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये सौच्छालय व घरकुल अनुदानात झालेल्या आर्थिक गैरप्रकारात दोषी सचिव डी. येरणे व माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच विनायक डोहे यांच्यावर चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार कारवाही न करता प्रशासन दोषींना पाठीशी घालून वेळ मारून नेत असल्याने दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्यामूळे आर्थिक गैरप्रकार करणारे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच महाराष्ट्र लेखा संहिता 2011 मधील सरपंचाचे अधिकार परिशीष्ट 2 मधील बाब क्रमांक 5 अन्वये आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे असे स्पष्ट होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या 4 जानेवारी 2017 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाहीस पात्र असल्याचा अहवाल पंचायत समितीला सादर केला असताना अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाही झाली नसल्याने दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार तर होत नाही ना अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण होत असल्याने तात्काळ दोषींवर कारवाही करण्याचे निवेदन दिले असून कारवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कढोली (खुर्द) वासीयांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here