घुग्घुस शहरात सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करण्याची राजकुमार वर्मा यांची मागणी

0
27

घुग्घुस शहरात सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करण्याची राजकुमार वर्मा यांची मागणी

घुग्घुस, ७ मे :– नगरपरिषद कार्यालयात अनुसूचित जाती विभाग काँग्रेस तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा यांनी शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाणपोईची व्यवस्था करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.

घुग्घुस शहराच्या सभोवताल विविध कंपन्या आहेत. तसेच उन्हाळा असुन वाढत्या उन्हाचा चढता पारा यामुळे नागरिक हैरान होत आहेत. कामाकरिता घराबाहेर पडणारे तसेच बाहेर परिसरातील येणारे नागरिक यांना नगरपरिषदेने शहरात असलेल्या विविध कंपनीच्या माध्यमातून शहराच्या सार्वजनिक ठिकाणी पानपोईची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here