लोकशाही बचाव दिवस आंदोलनात भाजप सरकारचा निषेध

0
233

लोकशाही बचाव दिवस आंदोलनात भाजप सरकारचा निषेध

चंद्रपूर, दि. 22 : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाहीची हत्या करीत हुकूमशाही पद्धतीने विरोधी पक्षांच्या 150 खासदारांचे निलंबन केले. त्यामुळे भाजप सरकारच्या या लोकशाही व संविधान विरोधी कृत्याचा निषेध करण्यासाठी जटपुरा गेट येथे शुक्रवारी (ता. 22) दुपारी 4 वाजता लोकशाही बचाव दिवस पाळून निषेध करण्यात आला. या आंदोलनात चंद्रपूर जिल्हा तथा महानगर समितीचे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित होते.

यावेळी आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरें, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे लीगल सेल जिल्हा अध्यक्ष किशोर पुसलवार, जिल्हा कोषाध्यक सर्फराज शेख, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महासचिव तब्बसूम शेख, महानगर उपाध्यक्ष सुनील सदभय्या, महानगर सहासंघटन मंत्री सिकेंदर सागोरे, राजकुमार नगराळे, प्रशांत सिदूरकर, नागसेन लभाने, शंकर धुमाळे, आशिष यमनुरवार, करण अतकरे, महेश ननावरे, स्वप्नील घागरगुंडे, जितेंद्र भाटिया आणि इतर पदाधिकारी व यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुसळे म्हणाले, “भाजप सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे. विरोधी पक्षांच्या आवाजाचे दमन करण्यासाठी भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. याचा आम्ही निषेध करतो. भाजप सरकारने तत्काळ 150 खासदारांना सदस्य बहाल करावे व लोकशाहीचे पालन करावे.”

राईकवार म्हणाले, “भाजप सरकारचे लोकशाही विरोधी धोरण जनतेला मान्य नाही. या सरकारला जनता बदलून टाकेल.”

गोखरें म्हणाले, “भाजप सरकारने लोकशाहीच्या मूळ तत्त्वांचे उल्लंघन केले आहे. याचा आम्ही निषेध करतो.”

यावेळी उपस्थितांनी भाजप सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here