तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिलेवर रानडुकरांचा हल्ला

0
1112

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिलेवर रानडुकरांचा हल्ला

महिला गंभीर जखमी उपचारार्थ नागपूर येथे भरती

 

 

कोठारी/राज जुनघरे
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर रानटी डुक्करच्या कळपाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दि.९ मे ला सकाळी ८.३० ला कोठारी येथ घडली असून जखमी महिलेचे नाव शोभा जगदीश तोडे(५५) असे आहे.

 

तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू झाला असून तेंडुपाने गोळा करण्यासाठी मजूर भल्या पहाटे जंगलात गेले असता वन विकास महामंडल वनपरिक्षेत्र झरण येथील कक्ष क्र. १ मध्ये रानटी डुकराच्या कळपाने अचानकपणे हल्ला चढविला त्यात मजूर महिला गंभीर जखमी झाली.आजूबाजुला महिलांना सदर प्रकार दिसून आला असता त्यांनी आरडाओरड केली असता रानटी दुकारांनी महिलेस सोडून पळ काढला.तोपर्यंत महिलेस अत्यंत गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या.तिच्या हात,पायाचे लचके तोडुन व डोक्यावरील संपूर्ण केस ओढून टक्कल केले तसेच उजव्या डोळ्याला गंभीर जखमी करीत डोळा निकामी झाल्याचे समजते.सदर वार्ता गावात पसरताच गावातील नागरिक जंगलात शोधाशोध करून घटनास्थळ गाठले.जखमी महिलेस कोठारी प्राथमिक केंद्रात उपचारार्थ दाखल केल्यानंतर सामान्य रुग्णालय चंद्रपूरला पुढील उपचारार्थ रवाना करण्यात आले.मात्र तिथे उपचार होऊ न शकल्याने तिला नागपूर ला रवाना केल्याचे कळते.सध्या सदर महिला जीवन मरणासाठी संघर्ष करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here