घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समितीचा अविरत उपक्रम

188

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समितीचा अविरत उपक्रम

नेत्ररुग्णांची सोळावी तुकडी सेवाग्राम येथे रवाना

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात गुरुवार २९ डिसेंबर रोजी सकाळी घुग्घुस परिसरातील जेष्ठ नागरिकांची सोळावी तुकडी सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आली. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसतर्फे हा अविरत उपक्रम सुरु आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार आरोग्यसेवा समिती महाराष्ट्र घुग्घुसच्या माध्यमातून आतापर्यंत पंधरा तुकडया जेष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आल्या आहे व हजारो रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून अतिशय चांगले सेवाकार्य घुग्घुस परिसरात होत आहे. कोणाला हि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया कराची असल्यास त्यांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर, बंडू बरडे, सुभाष मशाखेत्री, अजय लेंडे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

advt