वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी भूषण फुसे तर महासचिव पदी जयदीप खोब्रागडे व धीरज बांबोळे यांची नियुक्ती

0
605

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी भूषण फुसे तर महासचिव पदी जयदीप खोब्रागडे व धीरज बांबोळे यांची नियुक्ती

चंद्रपूर, 2 जाने. : वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर ची विस्तारित कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते भूषण खोब्रागडे यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. तर महासचिव पदी जयदीप खोब्रागडे व धीरज बांबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते फुसे यांनी राजगृहावर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला होता. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविण्यात आली. तर महासचिव पदी परत जयदीप खोब्रागडे व धीरज बांबोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे जिल्हाभरातुन अभिनंदन करण्यात येत असून पक्षाच्या वाढीसाठी अनुकूल प्रयत्न करावा अशा शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here