केळापूर येथे भाजपा आदिवासी आघाडी च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

0
450

पांढरकवडा तालुका/ प्रतिनिधि  रवि गुरनुले 

 

केंद्रात प्रथप्रधान नरेंद्रजी मोदी .यांच्या सरकारचे 7 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल सर्वांना आनंद होत आहे परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ह्यावर्षी कुठलाही आनंदोत्सव साजरा करण्याऐवजी जनते च्या सेवेत संपुर्ण देशभरात विविध सेवाप्रकल्प राबविले जात आहे त्याच अनुषंगाने

भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष श्री प्रतिकजी कुलसंगे यांच्या पुढाकाराने

दिनांक २९/०५/२०२१ रोजी श्री जगदंबा देवस्थान केळापूर येथे भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.कोरोना सारख्या महामारीच्या काळात रक्ताची आवश्यता नेहमी असते.रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन हंसराज अहिर साहेब व नितीनजी भुतडा .जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या मार्गदर्शनाखाली केळापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीकजी कुलसंगे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वतः रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले.सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती  राजू पडगीलवार जिल्हा सरचिटणीस,दत्ताजी राहाणे ,विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस डॉ. विवेकजी अंगाईतकर ,जिल्हा सचिव,सर्वश्री बशीर भाई,शंकररावजी सामृतवार तालुका अध्यक्ष,प्रितेशजी बोरले ता.अध्यक्ष युवा मोर्चा,बंटी जुवारे नगरसेवक,सौ रिताताई कनोजे नगरसेविका, डॉ. संजयजी घावडे, मदनभाऊ जिद्देवार,रमेश उग्गेवार,दिलीपजी मुथा, अजय आत्राम आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष, मनोज त्रिशुलवार,अश्विनीताई नरडवार, शीतल ताई बाजोरिया, शेखर जैस्वाल, धिरज शर्मा, जयंत भागांनगरकार,

नागोराव गेडाम,गजानन शिंगेवार,प्रदीप भणारकर,सुनील सीडाम, विलास जुमनाके,,नारायण भणारकर,अनिल बुद्धपवार,मनोज दीक्षित उपस्थित होते.

या शिबिराला भाजपा युवा मोर्चा व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here