दिल्ली चे लोकप्रिय नेते तथा आमदार विशेष रवी संविधान दिन व पक्ष स्थापना दिना निमित्त बल्लारपुर शहरात

0
353

दिल्ली चे लोकप्रिय नेते तथा आमदार विशेष रवी संविधान दिन व पक्ष स्थापना दिना निमित्त बल्लारपुर शहरात

आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर संयोजक रविकुमार शं. पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व किशोर पुसलवार यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर शहरात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन व पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रबोधनात्मक “कव्वाली” च्या माध्यमातून शहरातील जनतेला संविधानाचे महत्व व संवैधानिक अधिकारांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कार्यक्रमात संविधानाचे प्रख्यात वक्ते “विकास राजा” आम आदमी पार्टीचे दिल्ली विधानसभेचे सलग तिनदा सदस्य म्हणून निवडून आलेले आमदार मा. विशेष रवि, महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा भाऊ राचुरे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंह, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, मयुर राईकवार जिल्हा युवाअध्यक्ष ,संतोष दोरखंडे जिल्हा सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून बल्लारपूर शहर आम आदमी पार्टी आगामी निवडणुकीसाठी शहरातील जनते करिता काही विशेष घोषणा करण्यात येणार आहेत. करिता सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here