चिमूर विधानसभा क्षेत्रांतील महसूल विभागाच्या रिक्त पदांवर त्वरित उपाय योजना करा
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार भांगडीया यांची महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे मागणी

तालुका प्रतिनिधी
चिमूर
चिमूर विधानसभा क्षेत्रातील तहसील चिमूर येथे एक तहसीलदार,तीन नायब तहसीलदार,व अन्य कर्मचारी दहा रिक्त आहेत त्याच प्रमाणे भिसी येथील अप्पर तहसीलदार कार्यालय येथे एक अप्पर तहसीलदार,एक नायब तहसीलदार,व कर्मचारी एकूण पाच रिक्त आहेत,नागभीड तहसील कार्यालयातील एक नायब तहसीलदार व पाच कर्मचारी रिक्त आहेत अप्पर तहसील कार्यालय तळोधी (बाळापूर)येथे एक अप्पर तहसीलदार,एक नायब तहसीलदार व पाच कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत.
चिमूर तालुका हा भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्यात सर्वात मोठया तालुक्यात गणल्या जात असताना मंजूर झालेल्या पदांपैकी फक्त एकमेव नायब तहसीलदार वयोवृध्द श्री तुळशीराम कोवे(वय५६) यांचेकडून संपूर्ण तालुक्याचा प्रशासकीय कार्यभार सांभाळल्या जाण्यामुळे अतिरिक्त जबाबदारीच्या माध्यमातून अतिरिक्त प्रशासकीय ताण येऊन जीवित हानी झाल्यास चिमुरचा वाली कोण? अशी शोकांतिका आहे.
या बाबींची तात्काळ दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी मुंबई मांत्रालयात महसुल मंत्री श्री विजय उर्फ बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली व रिक्त पदांवर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली असून लवकरच रिक्त पदांवर उपाययोजना करण्याचा विश्वास महसुल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिला आहे.