अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
जिल्हा वर्धा

मातोश्री महिला महाविद्यालयात राष्ट्रीय युवा पंधरवाड्याचा समारोप
मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय हिंगणघाट येथे दिनांक २७ जानेवारी ला राष्ट्रीय युवा पंधरवाड्याचा समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून प्राचार्य नितेश रोडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली प्रसंगी नितेश रोडे यांनी पंधरवाड्यात घेतल्या गेलेल्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले, अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ उमेश तुळसकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महाविद्यालयात सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध होत राहील असे आश्वासन दिले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा अभय दांडेकर यांनी पंधरवाड्यात विद्यार्थिनींनी सहभागी होऊन पंधरवाडा यशस्वी रीतीने पूर्ण केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले, पंधरवाड्यात घेतल्या गेलेल्या निबंध स्पर्धा व पोस्टर स्पर्धा विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली, त्यात निबंध स्पर्धेत प्रथम कु. तेजस्विनी देहारी, द्वितीय कू कोमल उमक तृतीय कु पायल घानोडे तर प्रोत्साहन पारितोषिक कू मयुरी पदीले व पोस्टर स्पर्धेत प्रथम कू पायल घानोडे, द्वितीय कू नेहा कळसकर तर तृतीय कु कोमल उमक यांना मिळाला.
कार्यक्रमाचे संचालन सहकार्यक्रम अधिकारी प्रा सपना जयस्वाल तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा अश्विनी चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक व अध्यापकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती