महिला अत्याचार विरोधात भाजप जिल्हा महिला आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

0
295

महिला अत्याचार विरोधात भाजप जिल्हा महिला आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना दिले निवेदन

हिंगणघाट । अनंता वायसे

राज्यभरात महिलांवर प्रचंड प्रमाणात अत्याचार वाढले असतांना झोपी गेलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मा. आमदार समीरभाऊ कुणावर यांच्या मार्गदर्शनात भाजप जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ छाया सातपुते यांचे नेतृत्वात जनआक्रोश आंदोलना अंतर्गत प्रभारी उपविभागिय अधिकारी श्रीराम मूंदड़ा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज दि.१२ रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाच्या किसान आघाडीनेसुद्धा निवेदन देत आपला निषेध नोंदविला.

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन राज्यात होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधात घोषणाबाजी करीत राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. या धरणे आंदोलनात भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी,शहर अध्यक्ष आशिष पर्बत,तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे,भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, भाजयुमो तालुकाध्यक्ष विठु बेनीवार,किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गंगाधर कोल्हे, पंचायत समिति सभापती शारदा आंबटकर, नगरसेविका शारदा पटेल,रविला आखाड़े,अनिता मावळे,नीता धोबे,शुभांगी डोंगरे,वंदना कामडी,महिला आघाडी अल्पसंख्याक सेलच्या कौसर अंजुम तसेच संगीता मेंढे,सरिता उभाटे,शोभा बैसवारे,कल्याणी इटनकर, नीता गेडेकर तसेच महिला कार्यकर्त्या यावेळी मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here