केन्द्र शासन विरोधात काँग्रेसचे बैलबंडी आदोलंन
मोदी सरकारनेअन्यायकारी कृषि विधेयक त्वरित रद्द करावे
=====================
शेतकरी,शेतमजुर,कामगार यांचे जीवावर उठुन त्याचे अस्तित्व नेस्तनाबूत करण्याकरिता हुकुमशाही पध्दतीने मंजूर केलेल्या तीन कृषि व कामगार विधेयकाविरूध्दात पोम्भुर्णा तालुका काँग्रेस कमेटी द्वारा प्रकाश देवताळे,धनश्याम मुलचंदानी,कवडु कुदांवार,अतिक कुरेशी यांचे नेतृत्त्वात भव्य बैलबंडी मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला
शेतकरी याला जर व्यापारीनी विकलेल्या शेतमालाचे पैसे दिले नाहीत तर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करता येणार नाही,मोफत विजेच्या तरतुदीला पुर्ण विराम, काँट्रॅक्ट पध्दतीत योग्य पिके न आल्यास काँट्रॅक्टरला पिक नाकरण्याची सुट,साठेबाजी ला वाव,कृत्रिम टंचाईला संधी,न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही,कृषि विषयक सर्व अधिकार केन्द सरकार कडे राखीव,कृषि उत्पन्न बाजार समिती ,तिथले कर्मचारी,अडते,वास्तु, गोडावून यांचे अस्तित्व संपवणारे असे हे तीन काळे,अन्यायकारक विधेयक समुळ रद्द करा या मागणी साठी पोम्भुर्णा तालुका काँग्रेस कमेटी द्वारा शेतकरी शेतमजुर कामगार यांचा बैलबंडी मोर्चा काढुन तहसीलदार मार्फत महामहीन राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.
डाॅ आंबेडकर चौक येथून सुरू झालेल्या मोर्चाचे बसस्थानक चौक मध्ये सभेत रुपांतर होवुन प्रकाश देवताळे,घनश्याम मुलचंदानी,कवडु कुदांवार,अतिक कुरेशी यांचे समयोचित समोयोचित भाषणानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार डाॅ निलेश खटके यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रमोद बोरीकर,जयपाल गेडाम,रविन्द्र मरपल्लीवार,प्रशांत झाडे,वसंत मोरे,नंदू कुम्बरे,अशोक शिडाम,आनंद पातळे,साईनाथ शिन्दे,निलकंठ नैताम,रविन्द्र पेन्दोर,रुषी पोलेलवार,संजय बुरांडे,रमेश कन्नाके,प्रेमदास तोडासे,सुरेश सातपुते,कालीदास उइके,राजाराम मोहुर्ले,भगिरथ झाडे,प्रदीप बुटले विनोद थेरे शामसुंदर बदन,साईनाथ गोहणे चिंधु बुरांडे यांचे सह बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
