यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर अधिका-र्यांच्या शिष्टमंडळाची वढा येथे भेट

403

यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर अधिका-र्यांच्या शिष्टमंडळाची वढा येथे भेट

उपययोजनांचे नियोजन, तिर्थस्थळाची पाहणी

 

 

कार्तिकी एकादशीनिमित्त 8 नोव्हेबरला वढा येथे भरणार असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील सोयी सुविधांबाबात नियोजन करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर अधिका-र्यांच्या एका शिष्टमंडळाने वढा येथे भेट दिली आहे. यावेळी यात्रे दरम्याण करण्यात येणार असलेल्या उपयोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल टिपले, जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता शैलेश आंबेडकर, वढाचे सरंपच किशोर वरारकर, ग्रामसेवक प्रकाश रामटेके, शंकरपाटील देशमुख, संतोष मोहिजे, उषा मोहिजे, छाया गहुकर, वासुदेव ताजने, निखिल वरारकर आदींची उपस्थिती होती.

वढा जुगाद येथे वर्धा पैनगंगा नदिच्या संगम स्थळी दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रा भरते. येथे राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्या संख्येने येत असतात यंदा 8 नोव्हेबरला कार्तिक एकादशी असल्याने यात्र्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेपुर्वी येथील उपयोजनांच्या नियोजनासाठी अधिका-र्यांनी वढातिर्थक्षेत्र स्थळी भेट देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या होत्या.

दरम्याण आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हापरिषद येथील अधिका-र्यांनी वढा येथे जात यात्रेबाबतच्या सोयी सुविधांच्या नियोजनाची माहिती घेतली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या सुचनाही लक्षात घेण्यात आल्यात. येथील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे, नदीत बॅरिकेटींग करण्यात यावी, भाविकांच्या सोयी सुविधांची काळजी घेण्यात यावी, वाहण पार्किंगसाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात तात्पुरत्या बसस्थानकाची व्यवस्था करण्यात यावी आदी सुचना यावेळी करण्यात आल्या असून यंदाची यात्रेत भाविकांना कूठलीही अडचण येणार नाही या दिशेने नियोजन करणार असल्याचे यावेळी अधिका-यांनी म्हटले आहे.

advt