गडचिरोलीतील गर्भवती महिलेचा जीव वाचविला चंद्रपुर च्या रक्तदात्यांनी…

0
247

गडचिरोलीतील गर्भवती महिलेचा जीव वाचविला चंद्रपुर च्या रक्तदात्यांनी…


रक्तदान म्हणजे जीवनदान” गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी शहरातील गर्भवती महिला सौ. नविता दुर्गे (30) हिला अतिदुर्लभ असे A B निगेटिव्ह या रक्त गटाची अत्यंत आवश्यकता प्रसूतीच्या दरम्यान भासली असता क्षणाचाही विलंब न करता 2 जीवाचा प्रश्न असताना चंद्रपुर मधील रक्तमित्र संपर्क प्रमुख रिंकु कुमरे यांनी तातडीने आपला मित्र पड़ोली येथील रहिवासी रक्तदाता विपिन कोंगरे (30) या मित्राचे ब्लड ग्रुप A B निगेटिव्ह असल्याने तुरंत त्याना गडचिरोली ला पाठवुन महिला व त्यांचे नवजात शिशु या दोघांचे जीव वाचविन्यात यश मिलविले. रक्तदान म्हणजे जीवनदान यास साजेशी सामाजिक बांधिलकी जपत माता व नवजात शिशु यांचा जीव वाचविला.
समस्त चंद्रपुर व गडचिरोलीतील जनते द्वारे रक्तदाता विपिन आणि रक्तमित्र रिंकु कुमरे यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.

करा रक्तदान : मिळेल कुणाला जीवनदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here