शेकडो नागरिकांचे बनवुन दिले मतदार ओळखपत्र – श्रीनिवास गुडला

0
246

शेकडो नागरिकांचे बनवुन दिले मतदार ओळखपत्र – श्रीनिवास गुडला

घुग्घुस शहरातील शालीकराम नगर येथील काँग्रेस नेते व पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास गुडला यांनी बरेच नागरिकाच्या संपर्कात राहुन समाजसेवक करीत राहतात.

श्रीनिवास गुडला म्हणाले की,भारतात दरवर्षी कुठे ना कुठे निवडणुका होतात. निवडणुकीत मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. अनेक वेळा लोक निवडणुकीची तारीख जवळ आल्यावर अर्ज करण्याचा विचार करतात. निवडणुकीच्या काळात मतदार ओळखपत्र काढण्यासाठी लोक अनेकदा सरकारी कार्यालयात जातात. हे मतदार ओळखपत्र त्यांना निवडणुकीच्या वेळी आपला मताधिकार वापरण्यास आणि योग्य नेता निवडण्यास सक्षम करते. मतदार ओळखपत्र मिळवणे साधारणपणे सोपे असले तरी जागरूकतेच्या अभावामुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक वाटू शकते. आजच्या युगात स्मार्टफोन वापरून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करणे घरबसल्या सहज करता येते.

तसेच शालीकराम नगर, सुभाषनगर व गांधीनगर या परिसरात नागरिकांचे निशुल्क सेवाभावांनी शेकडो मतदार ओळखपत्र बनवुन दिले.

यावेळी पद्मशाली समाज अध्यक्ष व काँग्रेस नेते श्रीनिवास गुडला, महाकाली तिरुपती, शेखर तंगलापेल्ली, रतन पालावार, अंजु ईरुगुराला, सदय्या कलवेली, विजय माटला, अनिरुद्ध आवळे, अजय उपाध्ये, रमेश रुद्रारप, शहजाद शेख, अशोक जंगम, रवी शिदोला, राजानरशु बादे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here