मग्राराेहयाे कर्मचारी क्रूती समितीचे – चंद्रपूर जिल्हाधिका-यांना निवेदन ! CSCनियुक्ती बाबतचे शासन परिपत्रक रद्द करावे या मागणीसह अनेक मागण्यांचा समावेश !

0
711

मग्राराेहयाे कर्मचारी क्रूती समितीचे – चंद्रपूर जिल्हाधिका-यांना निवेदन ! CSCनियुक्ती बाबतचे शासन परिपत्रक रद्द करावे या मागणीसह अनेक मागण्यांचा समावेश !

किरण घाटे

चंद्रपूर:- सीएससीच्या अनुषंगाने नियुक्ती बाबतचे काढण्यांत आलेले शासन परिपत्रक त्वरीत रद्द करावे , सर्व कर्मचारी बांधवाचे आदेश राज्यनिधी अथवा सेतुमधुनच करण्यांत यावे तदवतचं कर्मचारी वर्गांच्या मानधनात वाढ करुन त्यांना पीएफ लागू करावा ,याेजना असे पर्यंत कर्माचा-यांना कामावर ठेवावे , जाँब सुरक्षा व विमा लागु करावा !या मागण्यांसह अन्य मागण्यांसह मग्राराेहयाे कर्मचारी क्रूती समितीच्या वतीने आज बुधवार दि. १९नाेव्हेंबरला दुपारी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना एक निवेदन सादर करण्यांत आले .

गेल्या आठ दहा वर्षापासून कर्मचारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण राेजगार हमी याेजना अंतर्गत कंत्राटी तत्वावर प्रामाणिक पणे व अखंडीतरित्या मग्राराेहची कामे करीत असुन वेळाेवेळी वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेचे व आदेशांचे तंताेतंत पालन करीत आहे .

काेव्हीड -१९या महासंकटात सुध्दा कर्मचारी वर्गांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता नित्य नेमाने कामे पूर्ण केली आहे .या सर्व परिस्थितीचा विचार शासनाने करावा असे निवेदनात प्रामुख्याने नमुद केले आहे .आज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करतांना चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडाे कर्मचारी बांधव उपस्थित हाेते .दरम्यान मग्राराेहयाे कर्मचारी क्रूती समितीचे अध्यक्ष सतिश वाढई , सचिव पंकज साखरकर , मनीषा बारसागडे , माेसिना शेख स्वाति गयनेवार , यांनी क्रूती समितीच्या मागण्यां रास्त असुन याचा शासनाने त्वरीत विचार करावा असे या प्रतिनिधीशी बाेलतांना आज म्हटले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here