स्व इंदिरा गांधींचे विचार युवतीकरिता प्रेरणादायी : आमदार प्रतिभाताई धानोरकर

0
396

स्व इंदिरा गांधींचे विचार युवतीकरिता प्रेरणादायी : आमदार प्रतिभाताई धानोरकर

राजु झाडे

चंद्रपूर : पुरुषप्रधान समाजात एका महिलेने पंतप्रधान होणं ही मोठी बाब होती. बांगला देश निर्मितीनंतर त्यांची लोकप्रियता पराकोटीला पोहोचली. विरोधी पक्ष विकलांग झाले. त्यावेळी त्यांनी देशाचा हिताकरिता महत्वाचे निर्णय घेतले होते. १९७३ मध्ये स्व. इंदिरा गांधी यांनी कोळसा क्षेत्रातील खाजगी पुंजीपतीचा विरोध करीत सरकारी करण केले होते. त्यांच्यामुळे राजकारणात महिला दिसून येत असून युवतींना त्यांचे कार्य प्रेरणादायी राहिले आहे. असे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. माजी प्रधानमंत्री स्व इंदिरा गांधी जयंती निमित्ताने उपजिल्हा रूग्णालय, वरोरा येथे फळ वाटप तसेच अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रम, बोर्डा, ता.वरोरा येथे फळ व धान्यकीट वाटप कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, इर्शाद शेख, प्रदेश महासचिव,हरीष कोत्तावार,जिल्हाधक्ष चंद्रपूर युवक काँग्रेस, विलास टिपले, वरोरा शहर प्रमुख काँग्रेस कमिटी, मनोहर स्वामी, सचिव, वरोरा शहर, काँग्रेस कमिटी, मिलिंद भोयर, वरोरा तालुका प्रमुख काँग्रेस कमिटी, शुभम चिमुरकर, वरोरा विधानसभा अध्यक्ष, युवा काँग्रेस कमिटी,देवेंद्र दडमल,तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस,योगेश लोहकरे,शहराध्यक्ष युवक काँग्रेस, रवींद्र धोपटे सभापती,पं.स. वरोरा, संजीवनी भोयर, उपसभापती, पं.स.वरोरा,चंद्रकला चिमुरकर, नगरसेविका, न.प. वरोरा,सन्नि गुप्ता, नगरसेवक, न.प.वरोरा,सुभाष दांडडे, पठाण जी,तुलसी अलाम,राहुल देवडे,विक्की वानखेडे, सोनुबाई येवले तसेच काँगेस पदाधिकारी, कार्यकर्ते व वृद्धाश्रमातील मंडळी उपस्थित होते. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here