यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन

0
492

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन

 

आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने बाबूपेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रसिध्दी प्रमूख नकुल वासमवार, विनोद अनंतवार, अमन खान, मुकेश चौव्हाण , रंकीत वर्मा, मनोज मत्ते, प्रशांत अड्डूर , श्रीकांत गजपाका, तिरुपति कलगुरूवार, राम जंगम, विक्की गुरलवार, प्रणय चाहंदे, सूरज कोडापे आदिंची उपस्थिती होती.

प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगिकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जंयती आज देशभरासह चंद्रपूरातही साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने बाबूपेठ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवनशैलीवर प्रकाश टाकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here