जनसेवा गोंडवाना पार्टी पूर्ण ताकतीनिशी लढेल

0
691

जनसेवा गोंडवाना पार्टी पूर्ण ताकतीनिशी लढेल

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अवचितरावजी सयाम यांच्या आदेशानुसार , चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, पोर्भुणा,गोंडपिपरी, जिवती, कोरपना, नगर पंचायतीच्या निवडणूक अनुषंगाने जनसेवा गोंडवाना पार्टी चंद्रपुर शाखेच्या वतीने दिनांक 3o/11/2021ला शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आढावा बैठकीच आयोजन करण्यात आले. बैठकीला प्रदेशअध्यक्ष प्रा.धिरज सेडमाके, चंद्रपुर लोकसभा अध्यक्ष बंडू मडावी,सल्लागार मुनेशवर आवळे, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष जनार्धन गावडे,राजुरा विधानसभा संघटक अनिल सिडाम,कोरपना तालुका अध्यक्ष शांताराम कुळसंगे, वरोरा तालुका अध्यक्ष निलेश कुमरे,जिल्हा उपाध्यक्ष गणेश कुळसंगे,शहर अध्यक्ष सतीश सोयाम,शहर संघटक करण मडावी,शहर उपाध्यक्ष रंजित येरकाडे,चंद्रपूर तालुका संघटक राजू मडावी,शहर महामंत्री कार्तिक पेंदाम,चंद्रपुर उपतालुका प्रमुख नंदा मडावी ,जिल्हा प्रसिद्धि प्रमुख मिथुन मसराम शहर प्रसिद्धी प्रमुख जगदिश परचाके,शांताराम इटकेलवार,राजू कन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.आढावा बैठकीच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा.धिरज सेडमाके यांनी म्हटले की आगामी होणाऱ्या नगरपंचायत निवडणूक जनसेवा गोंडवाना पार्टी पूर्ण ताकतीने लढेल , उमेदवाराच्या पाठीशी खंभीर पणे उभी राहिल, उमेदवाराला निवडून आणण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करेल , ज्या उमेदवाराना नगरपंचायात निवडणूक लढायची असेल त्या उमेदवारानी जनसेवा गोंडवाना पार्टीकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. जनसेवा गोंडवाना पार्टीचा झेंडा नगर पंचयात वर फडकलाच पाहिजे या साठी प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे .पुढे म्हटले की जनसेवा गोंडवाना पार्टी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढेल,सम विचारी पक्ष सोबत येत असेल तर युती करण्यास जनसेवा गोंडवाना पार्टी विचार करेल बैठकीला प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here