मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित पदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड

0
448

मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित पदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड

जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक खासदार व आमदार राहणार कायम निमंत्रित सदस्यपदी

मार्कंडा देवस्थानच्या विकासाला मिळणार गती

 

मार्कंडा / चामोर्शी:- विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देवस्थान ट्रस्टच्या कायम निमंत्रित सदस्यपदी जिल्ह्याचे पालकमंत्री स्थानिक खासदार व आमदार यांची आज देवस्थान ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. असून या निवडी बद्दल गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांचे अभिनंदन केले आहे.
मार्कंडा देवस्थान चे मंदिर मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुरुस्तीकरिता खुले करण्यात आले असून अजून पर्यंत काम पूर्ण नाही.त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या थांबलेल्या कामाला गती मिळावी. मार्कंडा देवस्थान च्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे विशेष लक्ष राहावे. या उद्देशाने मार्कंडा देवस्थान ट्रस्टने जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक आमदार व खासदार यांची कायम निमंत्रित सदस्य पदी निवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here