चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय श्रम आयुक्त स्थायी तथा कायमस्वरूपी देण्याबाबत थेट केंद्रीय मंत्रालयात सुरज ठाकरे यांची मागणी

0
470

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्रीय श्रम आयुक्त स्थायी तथा कायमस्वरूपी देण्याबाबत थेट केंद्रीय मंत्रालयात सुरज ठाकरे यांची मागणी

सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा (ब्लॅक गोल्ड सिटी) म्हणून ओळखला जातो, जिथे एशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचं महाऔष्णिक विद्युत केंद्र आहे. सर्वत्र जिल्ह्यामध्ये बहुतांश कोळसा खाणी व विविध सिमेंट कंपन्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनसंख्या ज्यामध्ये ३० ते ४० टक्के हा कामगार वर्ग आहे. यामुळे कामगारांन संदर्भातल्या समस्या व कामगार काम करीत असलेल्या शासकीय व खासगी आस्थापनांन बाबतच्या तक्रारीतमध्ये सातत्याने दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्वत्र कंपन्यांकडून कामगारांची पिळवणूक केल्या जाते. यामुळे कामगार हे न्यायाकरिता/स्वहक्कासाठी केंद्रीय श्रम आयुक्त यांच्याकडे धाव घेतात, पण आयुक्त साहेब कार्यालयात हजरच नसल्याच्या तक्रारी कामगारांकडून सतत येत असतात. यामुळे कामगारांच्या समस्या ह्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहेत. कामगारांना फक्त तारखाच दिल्या जात असल्यामुळे त्यांच्या आशेची निराशा होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे (नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली) या ३ जिल्ह्याचा प्रभार एकच आयुक्तावर असल्यामुळे चंद्रपूर येथील केंद्रीय श्रम आयुक्त कार्यालयात आयुक्तांचे गैरहजरीचे प्रमाण जास्त असल्यामुळे चंद्रपूर येथे केंद्रीय श्रम आयुक्त स्थायी तथा कायमस्वरूपी मिळण्याबाबत युवा स्वाभिमान पार्टी चंद्रपुर चे जिल्हाध्यक्ष यांनी कामगारांची गंभीरता लक्षात घेऊन युवा स्वाभिमान पार्टी चे आधारस्तंभ तथा मा. खासदार सौ. नवनीत रवी राणा यांच्या माध्यमातून थेट केंद्रीय श्रम मंत्रालयामध्ये शिफारस व मागणी करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here