तिवसा तहसील कार्यालयात उपवास आणि धरणे.

0
490

लढा संघटना आणि शेतकरी होणार सहभागी.

जिल्हा प्रतिनिधी/ देवेंद्र भोंडे

अमरावती/तिवसा :- तिवसा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे अनेक महत्त्व पूर्ण प्रकरणे तिवसा तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत.

या प्रलंबित प्रकरणामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतः च्या शेतात पेरणी करता येणार नाही,,काही नी कशी तरी पेरणी केली तर पिकांची आंतरमशागत करता येत नाही,,आणि नंतर पीक घरी आणता येत नाही.

या प्रकारामुळे अनेक शेतकरी मागील दोन वर्षांपासून तिवसा तहसील कार्यालयाच्या चकरा मारीत आहे. कोरोना मूळे सगळ्यांचे रोजगार थांबले आहेत. त्यात या प्रलंबित प्रकरणासाठी तहसील कार्यालयात सतत चकरा मारून होता नव्हता तो पैसा देखील संपला आहे.

या तिवसा तहसील कार्यालयात मागील २ ते ३ वर्षांपासून धुऱ्याचे, नाली चे इतर प्रकरण प्रलंबित आहेत.आज लढा संघटनेने तिवसा तहसीलदार यांना शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे धडक मोहीम आखून निकाली काढावी.अन्यथा दि १४ जून २०२१ ला लढा संघटनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी तिवसा तहसील कार्यालयात उपवास व धरणे आंदोलन करीत असल्याचे निवेदन दिले.

या वेळेस संजय देशमुख अध्यक्ष लढा संघटना,योगेश लोखंडे, निलेश राऊत,संदीप राघोर्ते, अंकुश गायकवाड,बाळा देशमुख, मंगेश ठाकूर,वैभव ठाकरे,सागर राऊत,पृथ्वी ताजी,अनुप अगले, प्रशांत राऊत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here