खेडकर कुटुंबावर काेसळला दु:खाचा डोंगर ! कांताबाई सातारकरांच्या पाठोपाठ आता कन्या अनिता आणि नातू बबलू यांना ही म्रूत्यूने कवटाळले ! 

0
1109

तालुका प्रतिनिधी

✍🏻ज्ञानेश्वर गायकर पाटील

 

अहमदनगर/संगमनेर :- ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं नुकतेच कोरोनामुळे निधन झालं होतं.

या धक्क्यातून सावरत नाही ताेचं संगमनेरकर व खेडकर कुटुंबावर पुन्हा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

ज्येष्ठ व नामवंत तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू अभिजीत ऊर्फ बबलू खेडकर यांचंही कोरोनामुळे निधन झालं अाहे .

8 दिवसांत कुटुंबातील तिघां जणांच्या निधनामुळे खेडकर कुटुंबावर शाेककळा पसरली आहे.

 

मागील महिन्यात 25 मे रोजी कांताबाई सातारकर यांचं दुखद निधन झालं होतं. खेडकर कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. अनिता ऊर्फ बेबीताई यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार सुरू असताना आधीच निधन झाले होते. तर नातू अभिजीत ऊर्फ बबलू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. अनिता या सुधा कुशल अश्या लावणी नृत्य कलाकार होत्या, त्यांचा ही नृत्य रसिक वर्ग मोठा होता. बबलू हा या घरातील लाडका होता, व ताे रघुवीर खेडकर यांना मदत करीत असत. संपूर्ण महाराष्ट्र खेडकर यांच्या पाठीमागे उभा राहील. आम्ही त्यांना दुःखाची जाणीव होऊन देणार नाही , असे ज्येष्ठ तमाशा अभ्यासक डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी सांगितले.या दुखद घटनेमुळे संगमनेर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here