विद्यार्थांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगी रुजवावे – आ. किशोर जोरगेवार

0
324

विद्यार्थांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार अंगी रुजवावे – आ. किशोर जोरगेवार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सक्षम समाज घडविणारे विचार साहित्याच्या माध्यमातून समाजाला दिलेत. त्यांचे विचार प्रकाशाकडे नेणारे असून संघर्ष वृत्ती निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्रावर त्यांचा नेहमीच भर असायचा अन्याया विरोधात लढण्याचे बळ म्हणजे शिक्षण असा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थांनी शालेय जीवनापासून त्यांचे विचार अंगी रुजवलेत तर शिक्षणाचे महत्व कळून शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सन्मानित वामनराव आमटे, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत देवगडे, पंडितराव पायघन, मातंग समाजाचे जेष्ठ नेते दीपचंद्र डोंगरे, अंकुश आमटे, यंग चांदा ब्रिगेडच्या शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल काटकर, वैशाली रामटेके, विमल मद्दीवार, चांदा वैरागडे, आरती आगलावे, स्मिता वैद्य, नंदा पंधरे, कलाकार मल्लारप, अमोल शेंडे, विश्वजित शाह, करणसिंग बैस, राहुल मोहुर्ले आदींची उपस्थिती होती. यावेळी १० वी आणि १२ वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, विद्यार्थी हा देशाचा पाया आहे. हा पाया मजबूत झाला तेव्हाच देश मजबूत होईल, चंद्रपुरातील विद्यार्थी विपरीत परीस्थित आपले कौशल्य दाखवत आहे. येथील निकाल दरवर्षी उत्तम येत आहे. ही गौरवाची बाब आहे. मात्र यावरच थांबता कामा नये. चंद्रपुरातील विद्यार्थाने उच्च शिक्षण घेत जिल्हाचे नाव देश, विदेशात लौकिक करावे, देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्यास विद्यार्थाची भूमिका महत्वाची राहणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य हा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षण क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले. त्यांचे विचार मानवतेकडे नेणारे आहे. एकता, समता, स्वतंत्र न्याय प्रस्तापित करणारे आहे. हे विचार विद्यार्थांनी आत्मसात करावे असे प्रतिपादन यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. विद्यार्थांना शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास मी सदैव त्यांच्या पाठीशी राहणार अशी ग्वाही ही त्यांनी या प्रसंगी बोलतांना दिली. यावेळी १० वी आणि १२ वीतील जवळपास ३० गुणवंत विद्यार्थांचा सन्मान चीन्ह व प्रमानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here