देवाडा येरगव्हाण गडचांदूर डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था : सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत

0
591

देवाडा येरगव्हाण गडचांदूर डांबरीकरण रस्त्याची दुरावस्था : सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत

प्रवाशांना प्रवास करताना करावी लागते तारेवरची कसरत

(अमोल राऊत) : राजुरा तालुक्यातील देवाडा, येरगव्हान मार्गे गडचांदूरला जोडणाऱ्या डांबरीकरण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघातास आमंत्रण ठरत आहे. या रस्त्यावरून येजा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे निदर्शनास येत आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचल्याने प्रवाशांना अंदाज बांधता येणे कठीण झाले आहे. खड्यात पाणी साचून असल्यामुळे अपघात होणे टाळता येत नाही. यामुळे येजा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.


गडचांदूर येथे सिमेंट कंपन्या असून सदर मार्गावर रहदारी असते. शिवाय तेलंगलातही या मार्गाने वाहतूक होत असते. या रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐन पावसाळ्यात मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली आहे.
मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे तयार झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत आहे. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीरतेने लक्ष देऊन तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजविणे गरजेचे आहे. अन्यथा होणाऱ्या अपघातास जबाबदार कोण असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here