कोठारीत विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची करोना चाचणी, १०० लोकांची चाचणी २ पाजिटिव्ह

0
495

कोठारीत विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांची करोना चाचणी, १०० लोकांची चाचणी २ पाजिटिव्ह

ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य विभाग पथकाची संयुक्त मोहीम

कोठारी, राज जुनघरे : महाराष्ट्र राज्य सह जिल्ह्यात करोना महामारीने थयमान घालत या आजाराचे लोन ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. त्यातच कोठारी आणि पळसगांव हे करोनाचे हाटस्पाट केंद्र ठरले असल्याने संचारबंदी कडक करण्यात आलेली आहे. प्रशासनातील पोलीस, आरोग्य, ग्रामपंचायत विभाग सतर्क असुन विना मास्क, विनाकारण लाकडाऊन काळात फिरणाऱ्या ची रॅपिड अंनटिजेन चाचणी करण्याची मोहीम या तिन ही विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आली.
मोहीमे दरम्यान एकूण १०० लोकांची चाचणी करण्यात आली. असता या चाचणीत दोघे जण पाजिटिव्ह आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी व मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर अचानक पणे सुरू झालेल्या या कार्यवाही मुळे विनाकारण फिरणाऱ्या ची चांगलीच धावपळ झाली. वारंवार आव्हाहने व मार्गदर्शक सूचना देऊन सुध्दा काही नागरिक विना मास्क, विनाकारण रस्त्यावर फीरुन करोना वाढीस कारणीभूत ठरत आहेत. यामुळे जनतेत जागृती निर्माण व्हावी यासाठी व बिनबोभाट रस्त्याने फिरणारांवर कार्यवाही व्हावी या दृष्टीने कोठारीत करोना चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सरपंच मोरेश्वर लोहे, ठाणेदार तुषार चव्हाण, ग्रामपंचायत, आरोग्य, पोलीस कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने राबविल्याने विनाकारण फिरणाऱ्या वर चांगलाच वचक बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here