पवित्र छटपूजा कार्यक्रमांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत भाविकांना दिल्या शुभेच्छा

0
166

पवित्र छटपूजा कार्यक्रमांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत भाविकांना दिल्या शुभेच्छा

चंद्रपूरात विविध ठिकाणी छटपूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा छटपूजेच्या ठिकाणी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत महापर्व छटपूजा उत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक पंकज गुप्ता, कलाकार मल्लारप, चंद्रमा यादव, अॅड. परमहंस यादव, विनोद गुप्ता, सुर्यप्रकाश पांडे, सुभेदार यादव, तिरुपती कलगुरुवार, शुभम जगताप, सुनील जैस्वाल, कृष्णा यादव, सुनील सोनकर आदिंची उपस्थिती होती.

चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा असल्याने कामानिमित्त्य येथे इतर राज्यातील नागरिक स्थायी झाले आहे. त्यामूळे चंद्रपूरात सर्व धर्मीय उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. उत्तर भारतीय नागरिकांचा पावन महोत्सव म्हणजेच छटपूजा ही येथे दरवर्षी साजरी केली जात असते. यंदाही चंद्रपूर शहरातील रामाळा तलाव, रयतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, पागलबाबा नगर, लालपेठ शिवमंदिर’ येथे छटपूजेनिमित्त्य कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी या घाटांवर भेट देऊन पूजा अर्चना केली. यावेळी आ. जोरगेवार यांनी भाविकांना छट पूजे निमीत्य शुभेच्छा दिल्यात. त्या पूर्वी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या घाटांच्या स्वच्छतेसह इतर व्यवस्था करण्यात आल्या होत्या. तसेच यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने येथे पुजा अर्चना करण्यासाठी येणा-या भाविकांसाठी चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here