डोंगरगाव येथे वृक्षस्मरण सांत्वन दिंड

0
473

डोंगरगाव येथे वृक्षस्मरण सांत्वन दिंड

वणी/यवतमाळ मनोज नवले 
तालुक्यातील डोंगरगाव वेगाव येथे “थोडसं जगणं समाजासाठी.” उपक्रमांतर्गत सात माता भगिनींना वृक्ष व साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ तालुका कार्यकारिणी वणी, नवेगाव (विरकुंड), विठ्ठलवाडी वणी, समस्त श्रीगुरुदेव सेवा मंडळ वणी तालुका तथा डोंगरगाव ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन “थोडसं जगणं समाजासाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. कोविड १९ च्या काळात तथापि त्या संधिकाळात मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबातील माता-भगिणींना मदतीचा व आधाराचा हात देवुन झिजलेल्या मातेसाठी कष्टाची परतफेड म्हणुन मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटूंबातील महिलांना वृक्ष व साडीचोळी भेट देवुन सांत्वन करण्यात आले.

यावेळी जि. प. सदस्य संघदिप भगत, सरपंचा कविता सोयाम, सतीश राजुरकर, मनिषा हिंगाणे, पोलीस पाटील पंढरी येटी. विठ्ठल माटे ग्रामगीताचार्य, विलास कालेकर, रुपाली पचारे यांच्या हस्ते स्व.लक्ष्मी सखाराम डुबे, स्व.झिबला गोसाई कन्नाके, स्व.मंजुळा उद्धव आमडे, स्व.प्रेमिला सुरेश टिकले, स्व.बळिराम तुल्लू आत्राम, स्व.मिरा लक्ष्मण मडावी, स्व.राहुल देविदास सोयाम या मृतकांच्या कुटूंबातील महिलांना साडीचोळी व वृक्षभेट देवुन सांत्वन करण्यात येवुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गुणवंत पचारे यांनी वृक्ष व त्याचे मानवी जीवनातील अनन्यस्थान यातील संबंध मार्मिक शब्दात मांडला. सरपंचा कविता पोयाम यांनी या उपक्रमाच्या माध्यमातुन पर्यावरण संतुलित राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे महत्व तळागळातल्या लोकांपर्यंत पोटतिडकिने गुरुदेव सेवा मंडळाकडुन सांगितल्या जात असल्याचे व गोरगरिब निराधार महिलांना साडीचोळी देवुन आपलेपणाची भावना निर्माण करित असल्याचे तथा संत गाडगेबाबांची वैचारिक चळवळ राबवित असल्याचे मनोभावे कौतुक केले.

या सत्कार्याला गावातील वारकरी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ सर्व डोंगरगाववासी,नवेगाव विरकुंड, झरपट यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मारोती खापने, प्रास्ताविक पुंडलिक नागरकर तर आभार विठ्ठल माटे यांनी मानले. विरकुंड येथील श्रीगुरुदेव सेवा भजन मंडळ यांनी या निमित्ताने सुश्राव्य भजनातुन आपली सेवा रुजू केली. कु.वैदेही खापने या शालेय मुलीने सुंदर स्वागतगीत सादर केले. संकल्पगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here