खासगी वाहन शोरुमवर माया कुणाची – त्यागीभाई देठेकर

0
456

खासगी वाहन शोरुमवर माया कुणाची – त्यागीभाई देठेकर

■ दुचाकी, चारचाकी गाड्यांचे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण

 

चंद्रपूर : शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांचे विक्री शोरूम मोठ्या संख्येने आहेत. मात्र या शोरूम मालकाच्या विक्रीसाठी ठेवलेल्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या केलेल्या पाहायला मिळते आहे. यात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून याकडे संबंधीत प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे. हे न उलगणारं कोडं असून यावर कुणाची माया आहे ? हा गंभीर आरोप पँथर चे जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर यांनी केला आहे.
चंद्रपूर शहर मोठ्या लोकसंख्या वस्तीचे असून जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. शहरातील अनेक रस्ते अरुंद आहेत. त्यातच वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. मात्र हे खासगी दुचाकी, चारचाकी शोरुम वाले मालक आपली विक्रीसाठी ठेवलेली नवीन वाहने ऐन रस्त्यावर उभी करुन दिवसभर ठेवतात. यात वाहतूक खोळंबत असून वाहन धारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या गंभीर प्रकाराकडे संबंधीत प्रशासनाचे अर्थपूर्ण तर दुर्लक्ष नाही ना ? असा सवालही उपस्थित झाला आहे. ही बेकायदेशीर रस्त्यावर ठेवली जाणारी वाहने शोरुम मालकाने आपल्या हद्दीत ठेवावी अन्यथा पँथर सेना आपल्या स्टाईलने वाहने हटवील असा इशारा पँथर चे जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here