क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

0
417

क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित महिला महाविद्यालय गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रमोद बोधाने, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश पाटिल, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. कुंदन दूफारे, डॉ. शरयु गहेरवार उपस्थित होते, विद्यार्थिनी मधून कु. पूजा देवगिरी, मृनाली लेनगुरे, संगीता कल्लो, काजल चान्दिकर् यांनी सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष जीवन यात्रेवर भाषण केले, कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. योगेश पाटिल यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. करिश्मा पुलो हिने केले.
डॉ.कुंदन दूफारे मार्गदर्शक् म्हणून बोलत असतांना ‘बदल हा अपेक्षित आहे आपन सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्ती चरित्र वरुण अर्धबोध घेऊन आपले जीवन कसे सकारात्मक बदलेल या वर विचार मंथन करायला हवे’ असे सांगितले तर डॉ. शरयु गहेरवार प्रमुख अतिथि म्हणून बोलत असताना ‘स्त्री शक्तिकरण प्रबल करण्यासाठी विद्यार्थिनीनीना उपाय योजना सांगितल्या ‘, डॉ. प्रमोद बोधाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ‘ इतिहास कालीन स्त्री, वर्तमान स्त्री आणी भविष्यातील स्त्रि’ या मधील मर्म भेद स्पष्ट केले, तर डॉ. योगेश पाटिल यांनी ‘जयंती हा कार्यक्रम केवळ नाममात्र न रहता या थोर लोकांच्या जयंती कार्यक्रम साजरा करीत असताना विद्यार्थी जीवनात त्यांचे अनुपालन करने हि काळाची गरज आहे’ आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
कार्यक्रमाला प्रा. प्रज्ञा त्रिपाठी, प्रा. खेवले, प्रा. सांगोलकर, प्रा. चहानंदे, श्री. गेडाम, श्री. दगामवार, श्रीमती वाईलकर, श्री. ठाकरे, श्री. धानोरकर, श्री. भोयर, श्री. धुडसे व महाविद्यालयतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here