पीक कर्ज भरावयास आलेल्या शेतकऱ्यांची सरपंचांनी मदत केली असता सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षानी केले अरेरावीचे वक्तव्य

0
710

पीक कर्ज भरावयास आलेल्या शेतकऱ्यांची सरपंचांनी मदत केली असता सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षानी केले अरेरावीचे वक्तव्य

राजुरा/काढोली बूज, विर पुणेकर : सेवा सहकारी संस्था कढोली बु. येथे सुहास झाडे नामक शेतकरी स्वतःचे पीककर्ज परतफेड करण्यास सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात आले असता सेवा सहकारी संस्थेचे सचिव सौ. शालू धांडे कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे ते लगेचच्या इमारतीला लागून असलेले ग्रामपंचायत कार्यालय येथे गेले आणि सरपंचाची भेट घेतली. त्यांनी सरपंचास सांगितले की मला माझे स्वतःचे पीककर्ज भरायचे आहे परंतु सेवा सहकारी संस्थेचे सचिव कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे व सतत मागील काही दिवसांपासून मी संबंधित सहकारी संस्थेच्या कार्यालयात फेऱ्या मारीत आहे. तरी मला त्यांच्याशी बोलणे शक्य झाले नाही आणि मला माझे पीक कर्ज परतफेड करून नवीन कर्ज घेणे अतिआवश्यक आहे. तरी तुमच्या कडून कुठली मदत होईल त्या आशेने तुमच्या कडे आलो आहे. तुमच्याकडे सचिव मॅडम यांच्या दूरध्वनी क्रमांक असल्यास त्यांना माझ्या मागील पीककर्जाची परतफेड किती आहे. आणि त्या पिककर्जावर व्याज किती आकारण्यात आले आहे, याची माहिती मिळाली तर मला माझे पीककर्ज भरण्यास मदत होईल. त्यावेळी सरपंच्यानी सचिव सौ. शालू धांडे मॅडम यांना दूरध्वनी द्वारे संबंधित माहिती वीचारली असता त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला. तेवढ्यात संबंधित सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षानी सरपंचास दूरध्वनीवर संपर्क केला आणि अरेरावी करत तुझी हुकूमशाही चालली आहे का तुला माहिती द्यायला! ही माहिती विचारांचा तुझा अधिकार नाही. अशा प्रकारचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून असे लक्षात येते की सेवा सहकारी संस्थेच्या अधक्ष्याना शेतकऱ्याच्या पीककर्जाची परतफेड महत्वाची नसून कुणाचे काय अधिक गौडबंगाल महत्वाचे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर वरिष्ठ स्तरावरून काय कायदेशीर कारवाई केली जाईल याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here