विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

0
426

विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी फास्ट ट्रैक कोर्टात खटला चालवावा : आ. सुधीर मुनगंटीवार

केम तुकुम अत्याचार प्रकरण

 

बल्लारपूर (चंद्रपूर)- राज जुनघरे
बल्लारपुर तालुक्यातील केमतुकुम येथील जि प प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने सात अल्पवयिन मुलींचा विनयभंग केल्या प्रकरणी पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासनाने विशेष वकीलाची नेमणुक करून फ़ास्ट ट्रैक न्यायालयात खटला चालवावा तसेच कायद्यातील तरतूदी नुसार मुलींच्या कुटुंबियाना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
दि. १२ऑक्टोबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले व त्यांच्याशी चर्चा केली. चंद्रपुर जिल्ह्यात महिला व मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. मात्र पीड़ितांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे आरोपीना कायद्याचा धाक उरलेला नाही. माणुसकिला काळीमा फ़ासणाऱ्या या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. या घटनांवर आळा बसावा या दृष्टिने शासनाने गंभीर्याने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सदर प्रकरणात पीडित मुलींना न्याय देण्यासाठी शासन खटला फास्ट ट्रैक कोर्टात चालवेल व आर्थिक मदतीबाबत तरतूद तपासून योग्य कार्यवाही करेल असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

 

मुख्याध्यापकचे निलंबन नाही
बल्लारपूर पंचायत समिती अंतर्गत केम तुकुम येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे यांनी पाचव्या वर्गातील मुलींसोबत लैंगिक अत्याचार करून शोषण केले.सध्या मुख्याध्यापक कारागृहात आहेत.मात्र सदर प्रकरणाला आठ दिवस उलटून गेले तरीही शिक्षण विभागाने त्यांचेवर कोणतीही कारवाई केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.याबाबत बल्लारपूर पंचायतीचे गट शिक्षणाधिकारी वर्षा फुलझेले याना स्थानिक प्रतिनिधींनी विचारले असता निलंबनाचा कोणताही आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here