दिलदार मित्र विजूभाऊ काळाच्या पडद्याआड! चंद्रपुरचे भूतपूर्व नगरसेवक विजय पाेटदुखे यांचे दुख:द निधन!

0
479

दिलदार मित्र विजूभाऊ काळाच्या पडद्याआड!

चंद्रपुरचे भूतपूर्व नगरसेवक विजय पाेटदुखे यांचे दुख:द निधन!

अनेकांनी वाहिली त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली ! 

किरण घाटे

चंद्रपूर:-जटपूरा गेट व रामनगर परिसरात विजू भाऊ या नावाने सुपरिचीत असणारे तसेच चंद्रपूर जटपूरा येथील भूतपूर्व नगरसेवक विजय पाेटदुखे यांचे साेमवार दि.२३ नाेव्हेबरला मध्यरात्री जटपूरा वार्ड येथील त्यांचे निवासस्थानी दुखद निधन झाले .म्रूत्यू समयी त्यांचे वय ६५वर्षाचे हाेते गेल्या चार वर्षापासून ते आजारी हाेते .महाविद्यालयीन निवडणूकीपासुन ते राजकारणात आले. फार माेठा मित्र परिवार त्यांचे पाठिशी उभा असल्यामुळे व सामाजिक कार्यात ते सदैव अग्रकमी राहात असल्या कारणाने विजय पाेटदुखे यांनी त्या वेळी नपची निवडणूक लढवली त्यात ते नगरसेवक म्हणून विजयी झाले .त्यांचे निधनाने पाेटदुखे परिवारावर दुखाचा डाेंगर काेसळला आहे .दिवगंत विजय पाेटदुखे यांना दाेन मुली एक मुलगा व पत्नी आहे .दरम्यान त्यांचे निधनाबद्दल नागपूरचे अजय धाेपटे , चंद्रपूरच्या जटपूरा विभागाच्या नगरसेविका छबूताई वेैरागडे , शैलेश जुमडे , अभय पाेटदुखे , जगदीश वाघमारे , कल्याणी सराेदे , गाेपाल गायकवाड़ , विलास मेहरकुरे , इश्वर गायकवाड़ , सतीश आष्टनकर , सुरेश कामडी आदिंनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित केली.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here