मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

0
452

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने मुख्याध्यापक कार्यशाळा संपन्न

 

 

जिवती :-  मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील विद्यार्थाना जीवन कौशल्य शिक्षण देण्याबाबत चा स्केल चा कार्यक्रम सुरू असून मार्च 2021 पासून जिवती तालुक्यात देखील प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात कार्य सुरू असून जिवती तालुक्यातील 31 गावातील 41 शाळेतील मुख्याध्याकांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा जिवती येथे करण्यात आले .

मुख्याध्याक कार्यशाळेच्या उदघाटनिय कार्यक्रमाला पंचायत समिती जिवती प्रभारी गट शिक्षणाधिकारी कोरडे , केंद्रप्रमुख, मॅजिक बस फाउंडेशन चे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे , जिवती तालुक्यातील 41 मुख्याध्यापक, प्राचार्य आदी उपस्थित होते .

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन बाबत ची माहिती सह चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या स्केल कार्यक्रमाची रूपरेषा सह जीवन कौशल्य शिक्षणाची गरज या सह संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सह चर्चा सत्र सह मार्गदर्शन व प्रास्ताविक प्रशांत लोखंडे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूर यांनी केले.
तर जिवती सारख्या दुर्गम भागात मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात येणार स्केल कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य विकास करीत अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे असे प्रतिपादन जिवती पंचायत समिती चे प्रभारी गटशिक्षणाधिकारी कोरडे यांनी केले .

तर कार्यक्रमाचे संचालन शाळा सहायक अधिकारी मुकेश भोयर यांनी केले तर आभार सुरेंद्र खंडेराव यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वीत ते करिता मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे कर्मचारी, समुदाय समन्वयक दीपिका सोलंकर, मेघा रुंजे , लक्ष्मण हरगिले, सुरेश चौहान यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here