माजी आमदार निमकर यांच्या हस्ते सुनीता उरकुडे यांचा सत्कार

0
435

माजी आमदार निमकर यांच्या हस्ते सुनीता उरकुडे यांचा सत्कार

रामपूर ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी विराजमान

सेना-काँग्रेस ला धोबी पछाड

 

राजुरा : तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत पैकी रामपूर ग्राम पंचायतीची दि.14 जानेवारी रोजी झालेल्या उपसरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या पण अटीतटीच्या निवडणुकीत ग्राम विकास आघाडी समर्थीत भारतीय जनता पक्षाच्या सौ. सुनीता मधुकर उरकुडे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्धल माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सेना-काँग्रेस पक्षाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र ग्राम विकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या डावपेचाने विरोधकांचे मनसुबे उधळवून कठीण असलेल्या निवडणुकीत एका मताने विजय संपादित करून सेना-काँग्रेस ला धोबीपछाड दिली. विरोधकांकडे बहुमत असतांना ग्राम विकास आघाडीच्या सुनीता उरकुडे यांचा विजय हे मागील तीन वर्षात झालेल्या विकास कामांची साक्ष आहे. पुढील कालावधीसाठी सुनीता उरकुडे यांच्या खांद्यावर उपसरपंच पदाची धुरा आल्याने त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या असून गावाच्या विकास कामाची जबाबदारी सरपंच वंदना गौरकार व उपसरपंच सुनीता उरकुडे यांच्यावर असल्याचे निमकर यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजप चे जिल्हासचिव तथा ग्राम पंचायत खामोना-माथरा चे सरपंच हरिदास झाडे, राजुरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, मारोतराव कायडिंगे, मारोती जानवे, प्रकाश फुटाणे, राजकुमार भोगावार, मधुकरराव उरकुडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here