नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे 6 डिसेंबरला आयोजन

0
462

नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे 6 डिसेंबरला आयोजन

 

 

राजुरा : सामाजिक कार्यात नेहमी हिरीरीने भाग घेऊन अग्रेसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल राऊत यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विश्वभूषण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने खरी आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

अमोल राऊत वर्षातून दोनदा रक्त शिबिराचे आयोजन करून गरीब, गरजूंना नेहमी रक्ताची मदत मोठ्या सेवेभावेने करतात. 6 डिसेंबरला परमपूज्य, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

बुद्धभूमी बसस्थानक समोर राजुरा येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नागवंश युथ फोर्स राजुराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मुख्य संयोजक अमोल राऊत यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here