गोंडपिपरी येथे येत्या 9 डिसेंबरला विराट धम्म मेळाव्याचे आयोजन

342

गोंडपिपरी येथे येत्या 9 डिसेंबरला विराट धम्म मेळाव्याचे आयोजन

प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजनहृदय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती

 

गोंडपिपरी : 9 डिसेंबर शुक्रवारला दुपारी 12 वाजता जनता महाविद्यालय गोंडपिपरी येथील भव्य पटांगण येथे विराट धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याचे अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून बहुजनहृदय सम्राट, श्रद्धेय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे उदघाटक मा. भदंत करूणाकार महाथेरो (दिल्ली) मार्गदर्शक तथा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

या विराट धम्म मेळाव्यास बहुजन उपासक व उपसकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक भारतीय बौद्ध महासभा तालुका गोंडपिपरी व सर्व बहुजनवादी संघटना तालुका गोंडपिपरी च्या वतीने करण्यात आले आहे.

advt