राजुरा तहसीलदार यांचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

0
428

राजुरा तहसीलदार यांचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

गायरण जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार, वाघमारे यांच्या अडचणीत वाढ

राजुरा/अमोल राऊत

बामनवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शिवाजी हायस्कूल राजुरा येथील कर्मचारी सर्वानंद वाघमारे यांनी शासनाच्या सर्वे. नं.१७३ आराजी ०.५५ हे. आर. गायरण जमिनीवर बेकायदेशीर उद्यान केले आहे. ते एका नामांकित शिक्षण संस्थेचे कर्मचारी असून ते शासनाचा पगार घेतात.

बामनवाडा येथील बेकायदेशीर असलेल्या उद्यानाच्या नावावर अनेक निधी आणून तो निधी खर्ची केले असल्याची माहिती पुढे आली आहे. शासनाची परवानगी नसताना निधी मंजूर झाला कसा असा प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. या जमिनीवर आदिवासींची पिढ्यानपिढ्या वाहिती असताना वाघमारे यांनी त्यांना वाहिती करू दिली नाही व तारेचा कुंपण करून घेतला. जमीन गेल्याने मुर्ती या गावी जावून शेती करीत आहो अशी आप बिती बामनवाडा येथील आदिवासी विठू कोडापे यांनी कथन केली.

सदर उद्यान बेकायदेशीर असल्याने या प्रकरणाची दखल राजुरा तहसीलदार यांनी घेतली असून उपसरपंच वाघमारे यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिल्याची माहिती पुढे आली आहे.

शासनाची कुठलीही परवानगी नसताना वाघमारे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांचे कडून ग्रीन/ओपन जिम चे लाखोंचे साहित्य मिळविले. त्या उद्यानात साहित्य मिळाले कसे? असा सवाल यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कुलमेथे केंद्रीय संयोजक आदिवासी न्याय हक्क परिषद यांनी उपस्थित केला आहे.

सदर उद्यान बेकायदेशीर असल्याने दिनांक २१/८/२०२० ला तहसीलदार राजुरा यांचे कडून अतिक्रमण काढण्याचे आदेश उपसरपंच वाघमारे यांना आले आहे. सदर जमिनीवर अतिक्रण करणे, शासनाच्या निधीचा अपव्यय करणे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उपसरपंच वाघमारे अतिक्रमण काढणार काय? तहसीलदार राजुरा यांच्या आदेशाचे पालन उपसरपंच वाघमारे करणार काय? अतिक्रमण न काढल्यास तहसीलदार उपसरपंच वाघमारे यांचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करणार काय? असे प्रश्न बामनवाडा येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

८ दिवस लोटूनही अजूनही वाघमारे यांनी अतिक्रमण हटविले नाही हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here